स्वातंत्र्यदिनानिमित्त महिंद्राची 4 नवी SUV कॉन्सेप्ट सादर; 2027 पर्यंत उत्पादनात येणार, ‘व्हिजन S’ सर्वात लहान SUV
नवी दिल्ली – देशाच्या 79व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने वाहन निर्माता महिंद्राने चार नवी SUV कॉन्सेप्ट — व्हिजन S, व्हिजन X, व्हिजन T आणि व्हिजन SXt — सादर केल्या.
या केवळ नव्या गाड्या नसून महिंद्राच्या पुढील काही वर्षांतील डिझाइन, तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्स रोडमॅपचे दर्शन घडवणाऱ्या आहेत.
नवे प्लॅटफॉर्म आणि पावरट्रेन महिंद्राने यावेळी एक नवे मोनोकॉक स्ट्रक्चरवर आधारित SUV प्लॅटफॉर्मही दाखवले.
हे विद्यमान स्कॉर्पिओ N सारख्या बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे असून यावर इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि पेट्रोल अशा तिन्ही प्रकारच्या पावरट्रेनची सोय असेल.
यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील आणि फ्युएल एफिशियन्सीही वाढेल.
चारही कॉन्सेप्टची वैशिष्ट्ये
व्हिजन S – महिंद्राची आतापर्यंतची सर्वात कॉम्पॅक्ट SUV. सब-4 मीटर लांबीची असल्याने शहरातील रस्ते व अरुंद गल्लीबोळात सहज फिरवता येईल. तरुण ग्राहकांसाठी आकर्षक डिझाइन.
व्हिजन X – SUV व सेडानचा संगम असलेला स्लीक क्रॉसओव्हर. स्टायलिश, आधुनिक लुकसह शहरातील व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य.
व्हिजन T (थार) – महिंद्रा थारच्या पुढील पिढीचे दर्शन. दमदार ऑफ-रोड क्षमता, हाय ग्राउंड क्लीअरन्स आणि रग्ड डिझाइनसह. इलेक्ट्रिक व्हर्जनची शक्यता.
व्हिजन SXt – मोठी, कुटुंबासाठी उपयुक्त SUV. अधिक स्पेस, फ्लॅट फ्लोर आणि अत्याधुनिक फीचर्ससह. लांब प्रवासासाठी आदर्श.
डिझाइन व लॉन्च टाइमलाइन
या सर्व कॉन्सेप्टमध्ये महिंद्राची सिग्नेचर डिटेलिंग, मजबूत बॉडी आणि प्रीमियम इंटीरियर आहे.
गाड्यांची लांबी 4 मीटरपासून 4.6 मीटरपर्यंत असेल. 2027 पर्यंत या कॉन्सेप्टचे प्रॉडक्शन मॉडेल्स बाजारात येण्याची शक्यता असून,
यामुळे FWD (फ्रंट-व्हील-ड्राईव्ह) SUV सेगमेंटमध्ये महिंद्राची पकड अधिक मजबूत होईल.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/gst-cassilchi-pudil-meeting-support/