आर.जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंट शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कारंजा (लाड) –आर.जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंट शाळेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमलभाऊ चवरे, जे.सी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हरसुले सर,
आर.जे. चवरे प्राथमिक व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. चोपडे, कॉन्व्हेंटच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. हेडा,
पर्यवेक्षक श्री. गंधक, आर.जे. किड्स इंचार्ज सौ. खेडकर आणि समन्वयिका सौ. रागिणी चवरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीताच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, गिटार वादन आणि प्रेरणादायी प्रसंग सादर केले.
सौ. चोपडे यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून ध्येय साध्य करण्याचा सल्ला दिला तर अमलभाऊ चवरे यांनी तरुण पिढीने ऐतिहासिक घटना व बलिदानातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
या निमित्ताने निघालेल्या रॅलीत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम, जालियनवाला बाग हत्याकांड,
दांडी यात्रा आणि क्रांतिकारकांचे बलिदान अशा ऐतिहासिक प्रसंगांचे नाट्यरूप सादरीकरण केले. रॅली शहरातील प्रमुख चौकांतून उत्साहात पार पडली.
गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, रवि काका चवरे आणि अमलभाऊ चवरे यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनय व सादरीकरणाचे कौतुक केले.
४० विद्यार्थ्यांनी देशभक्तांच्या वेशभूषेत सादरीकरण केले. पोलिसांनी यशस्वीतेसाठी प्रभावी बंदोबस्त ठेवला होता. शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम भव्यदिव्य पार पडला.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/chinachi-bharatvishya-mothi-declaration/