चीनची भारताविषयी मोठी घोषणा

अमेरिकेला शह देण्यासाठी ‘ड्रॅगन-हत्ती’ची जवळीक वाढणार

चीनची भारताविषयी मोठी घोषणा; अमेरिकेला शह देण्यासाठी ‘ड्रॅगन-हत्ती’ची जवळीक वाढणार

बीजिंग/नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आलास्का येथे बैठक सुरू असतानाच,

चीनने भारताविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

अमेरिकेच्या दादागिरीला प्रत्युत्तर देण्यासाठी चीन आणि भारत या दोन विकसनशील महासत्ता एकत्र येण्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसू शकतो.

अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच रशियाशी व्यापार केल्याबद्दल भारतावर आर्थिक दंडही ठोठावला आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी भारत आणि रशियाची अर्थव्यवस्था “मृतावस्थेत” असल्याची टीका केली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने भारतीय बाजारपेठेचे महत्त्व अधोरेखित करत, भारतासोबत भागीदारीची गरज व्यक्त केली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले की, “ड्रॅगन आणि हत्ती यांनी एकमेकांना यशस्वी होण्यासाठी मदत करावी.

भागीदार म्हणून सहकार्य करणे हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे.”

गलवाननंतरचा बदलता सूर

2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या लढतीनंतर दोन्ही देशांतील संवाद थंडावला होता.

मात्र, सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे बीजिंग आणि नवी दिल्ली पुन्हा जवळ येण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे आणि जागतिक मंचावरील संघर्षामुळे चीनला भारताची नितांत गरज आहे.

दुसरीकडे, भारत ब्रिक्ससारख्या गटांद्वारे आपली आंतरराष्ट्रीय पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

या नव्या समीकरणामुळे आशियातील राजकीय आणि आर्थिक संतुलनात मोठा बदल होऊ शकतो.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/dhananjay-mundenna-hyikortcha-ankhi-ek-danka/