चान्नी – वनविभाग अकोला अंतर्गत आलेगाव वनपरिक्षेत्र आणि जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चान्नी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या
मैदानावर हरित सप्ताहानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जय बजरंग मंडळाचे संस्थापक संचालक गजाननभाऊ इंगळे यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी म्हणून आलेगाव वनपरिक्षेत्राचे आर.एफ.ओ. मा. पवन जाधव, वनपाल एम.के. सय्यद उपस्थित होते.
यावेळी मंचावर जय बजरंग मंडळाचे संचालक मधुकर गाडगे व प्रकाश बंड, वनरक्षक एस.बी. मस्के, पी.एस. राठोड, ई.डी. सरदार तसेच प्राचार्य संग्राम इंगळे उपस्थित होते.
स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात विविध प्रजातींची वृक्षलागवड करण्यात आली.
प्राचार्य संग्राम इंगळे यांनी प्रास्ताविकातून वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यानंतर पवन जाधव यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले व लावण्यासाठी घरी तसेच शेतावर वृक्षाचे रोप वाटप केले.
अध्यक्षीय भाषणात गजाननभाऊ इंगळे यांनी निसर्गसंवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे मार्गदर्शन केले.
विद्यालयातील लोकमान्य टिळक स्काऊट पथक व अहिल्याबाई होळकर गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी सुद्धा वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्काऊट शिक्षक वसंत ढोकणे यांनी केले. यावेळी हरित सेना प्रभारी शिक्षक संजय जायभाये, पर्यावरण विभाग प्रमुख गजानन गाडगे,
संजय खडके, एस.आर. गोपनारायण, संजय बोचरे, मंगेश शिरसाट, रामेश्वर राठोड, गणेश कालापाड, भावना भांडे, शारदा गाडेकर, वैशाली जाधव आणि सुदर्शन निलखन उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर जयंतीनिमित्त पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/andura-yehethe-swatantri-din-sjra-sajra/