स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अवर्णनीय – पालकमंत्री संजय राठोड
जिल्ह्यात शेतकरी, उद्योग, महिला व युवकांसाठी विविध योजनांचा लाभ
यवतमाळ – “स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या शुरविरांचे योगदान अवर्णनीय असून, त्यांच्यामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत,”
असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 2 लाख 94 हजार शेतकऱ्यांना ‘महासन्मान निधी’ तर 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांना वीजबिल माफीचा लाभ मिळाला आहे.
अतिवृष्टीग्रस्त 1 लाख 46 हजार शेतकऱ्यांना 155 कोटींची मदत देण्यात आली. उद्योगवाढीसाठी 81 उद्योग घटकांसोबत 1,603 कोटींचे गुंतवणूक करार झाले आहेत. 3,249 प्रशिक्षणार्थ्यांना 17 कोटींचे विद्यावेतन दिले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत 6 लाख 92 हजार महिलांना दरमहा ₹1,500, तर ‘अन्नपूर्णा’ योजनेत मोफत सिलेंडरचा लाभ मिळत आहे.
‘तीर्थदर्शन’ योजनेत 570 ज्येष्ठांना अयोध्येचे दर्शन घडविण्यात आले. आरोग्य योजनांमधून 86 हजार रुग्णांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळाले.
जिल्ह्यात पायाभूत सुविधांसाठी महामार्ग, रेल्वे लाईन आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी मोठा निधी देण्यात आला आहे.
कार्यक्रमानंतर परेड निरिक्षण, माजी सैनिकांचा सत्कार आणि विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/trupti-bar-and-restaurant-fierce-fire-millions-of-damage/