यवतमाळात ‘रानभाजी महोत्सवा’ची रंगत

यवतमाळात ‘रानभाजी महोत्सवा’ची रंगत

यवतमाळात ‘रानभाजी महोत्सवा’ची रंगत; शहरी नागरिकांसाठी औषधी भाज्यांची पर्वणी

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन; शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ

यवतमाळ  – पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या औषधी रानभाज्यांची ओळख शहरी भागातील नागरिकांना व्हावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी,

या उद्देशाने यवतमाळात जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सवा’ला सुरुवात झाली.

कृषी विभाग आणि ‘आत्मा’च्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक स्वावलंबन केंद्रात हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सकाळी १० वाजता झालेल्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्याच्या समृद्ध वनक्षेत्रात अनेक प्रकारच्या औषधी रानभाज्या व वनस्पती आढळतात.

या भाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि पारंपरिक पाककृतींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे.

महोत्सवात विविध रानभाज्यांचे स्टॉल्स लावण्यात आले असून, शहरातील नागरिक आवडीने खरेदी करत आहेत.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/cancer-promotional-aani-vaccine-rare/