“हर घर तिरंगा” मानवी साखळी व प्रभातफेरी

“हर घर तिरंगा” मानवी साखळी व प्रभातफेरी

कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयात “हर घर तिरंगा” मानवी साखळी व प्रभातफेरी

कामरगाव – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पी.एम.श्री. जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव येथे “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत मानवी साखळी व प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी “स्वच्छता, पर्यावरण व देशभक्ती – आरोग्यदायी जीवन, सशक्त राष्ट्र”, “पर्यावरण वाचवा – देश वाचवा”, “स्वच्छ भारत – सुंदर भारत”, “भारत हमको जान से प्यारा है”, “वंदे मातरम – भारत माता की जय”, “एक भारत – श्रेष्ठ भारत” अशा जोशपूर्ण घोषणांनी गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभातफेरी काढली.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छ सुजल गाव ही प्रतिज्ञा घेतली तसेच घरोघरी स्वच्छतेच्या रांगोळ्या काढण्याचा संकल्प केला.

महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, वाशिम तर्फे जिल्हाभर “हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता” उपक्रम राबविला जात आहे.

हा उपक्रम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकसहभागाचा उत्सव ठरत आहे.

शालेय विद्यार्थी, स्वयंसेवक, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड, पर्यवेक्षक गोपाल खाडे, विकास रुईकर, स्काऊट गाईड विभाग प्रमुख सतीश चव्हाण, दिपाली खोडके

तसेच सर्व स्काऊट गाईड व शिक्षकवर्ग सक्रियतेने सहभागी झाले.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/akolidat-illegal-savakarawar-dhad-gunha-sankal/