मोठी बातमी! चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात, जगनमोहन रेड्डींचा खळबळजनक दावा
आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी
यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यातील संपर्काबाबत मोठा दावा केला आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून दिल्लीपासून ते आंध्र प्रदेशपर्यंत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
जगनमोहन रेड्डी यांनी असा आरोप केला की, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात “हॉटलाइन” म्हणून काम करत आहेत.
ते म्हणाले, “काँग्रेसने कधी टीडीपीविरोधात भाष्य केले आहे का? आंध्र प्रदेशातील मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी का गप्प आहेत?
लोकसभा निवडणुकीबरोबरच येथे विधानसभा निवडणुकाही झाल्या, तरीही काँग्रेस या प्रकरणावर मौन बाळगून आहे.”
रेवंत रेड्डी यांचा टीडीपीशी जुना संबंध असल्याचेही जगनमोहन रेड्डी यांनी नमूद केले. “काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी रेवंत रेड्डी टीडीपीमध्ये होते.
त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पडद्यामागे संपर्क सुरू आहे, हे स्पष्ट दिसते,” असे ते म्हणाले.
या दाव्यांनंतर भाजपमध्येही खळबळ माजली आहे. कारण, आतापर्यंत टीडीपीने मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपच्या समर्थनार्थ कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.
त्यामुळे रेड्डींच्या आरोपांमुळे आंध्र प्रदेशातील आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/chaholit-gym-trainer-taruni-and-mitrakadun-youth-murdered/