कबुतरखान्यापासून मांसबंदीपर्यंत; राज ठाकरेंची बेधडक फटकेबाजी, , जैन मुनींना थेट इशारा!
मुंबई – दादरमधील कबुतरखाना बंदीवरून पेटलेल्या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच तुफान प्रतिक्रिया दिली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सर्वांनी वागावं लागेल, जैन मुनींनाही हे समजलं पाहिजे, असं ठणकावून सांगत ठाकरे म्हणाले –
“कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे!”
दादर कबुतरखाना बंदीनंतर जैन समाजाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर ठाकरे म्हणाले – “त्या आंदोलनकर्त्यांवर तेव्हाच कारवाई झाली पाहिजे होती.’
“ याचबरोबर त्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही हल्लाबोल करत “लोढा-बिढांनी मध्ये येऊ नये; ते एका समाजाचे नाही, तर राज्याचे मंत्री ‘
आहेत, त्यांनाही न्यायालयाचा निर्णय पाळावा लागेल,” असा टोला लगावला.
दरम्यान, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी राज ठाकरे यांना साकडं घालत मराठी-मारवाडी वाद मिटवण्याची विनंती केली.
‘”मराठी भाषेला अपमान करणाऱ्यांविरोधात तुम्ही ठाम भूमिका घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असं ते म्हणाले.
तसेच मराठी समाजाची माफी मागत त्यांनी गैरसमज दूर करण्याचं आवाहन केलं.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/geeta-nagjava-pickup-loading-car-overturned/