धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन
पैलपाडा रेल्वे गेटजवळ मध्यरात्रीची घटना
बोरगाव मंजू – काटेपुर्णा ते बोरगाव मंजू दरम्यान पैलपाडा रेल्वे गेटजवळ धावत्या हावडा एक्स्प्रेस (क्र. १२८३४) मधून पडून एका ३८ वर्षीय प्रवासी तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) मध्यरात्री दोनच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोरगाव मंजू पोलिसांना दिली.
ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रविंद्र धुळे, हेडकॉन्स्टेबल प्रमोद गोपनारायन, अनिल आंबिलकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मृत तरुण बांधा मजबूत, रंग निमगोरा, उंची ५.५ फूट असून अंगावर आकाशी रंगाचा टी-शर्ट आणि फिकट निळा जीन्स परिधान केलेला आहे.
त्याच्याकडे चक्रधरपूर ते भरुच असा रेल्वे तिकीट सापडले. मात्र, ओळख पटविण्यास मदत होईल असा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता , या तरुणाबाबत ओळख किंवा नाते सांगणाऱ्यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुढील तपास सुरू आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/white-muskhe-janak-theate-lal-krishnavar/