पेट्रोल पंपावर सरपंचाला बेदम मारहाण; सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद
मूर्तिजापूर (जि. अकोला) : मूर्तिजापूर शहरातील बुब पेट्रोल पंपावर निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके यांना दोन व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, नेमकी मारहाण कशावरून झाली याचा तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत.
रांगेत उभे राहण्यावरून वाद
घटनेची प्राथमिक माहिती अशी की, सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामे आटपून आपल्या गावी जात असताना पेट्रोल भरण्यासाठी बुब पेट्रोल पंपावर थांबले.
यावेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रामखेडा येथील वसिम व इमरान या दोघांनी सरपंचांना जबर मारहाण केली.
गंभीर दुखापत
मारहाणीमध्ये प्रदीप फुके यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.
पोलीस तपास सुरू
मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/vidyarthansathi-piriyads-lewhi-magani/