फोटो काढण्यावरून जया बच्चन चिडल्या

फोटो काढण्यावरून जया बच्चन चिडल्या

फोटो काढण्यावरून जया बच्चन चिडल्या; स्वतः सांगितलं खरं कारण, कंगनाची तिखट टीका

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या चिडक्या स्वभावामुळे चर्चेत आल्या आहेत.

दिल्लीत संसदेच्या आवारात सेल्फी घेण्यासाठी जवळ आलेल्या एका व्यक्तीला त्यांनी धक्का दिला आणि त्याच्यावर ओरडल्या.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी आणि सेलिब्रिटींकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

जया बच्चन नेहमीच एवढ्या चिडचिड्या का असतात, याविषयी त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे.

नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्या म्हणाल्या, “जे लोक खासगी आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि त्याचं उत्पादन बनवून विकतात, अशा लोकांचा मी तिरस्कार करते.

कामावर मत मांडणं मला मान्य आहे, पण वैयक्तिक आयुष्य किंवा चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

याआधीही पापाराझींवर आणि फोटोग्राफर्सवर चिडण्याच्या त्यांच्या घटना चर्चेत आल्या आहेत.

“मी चालत असताना माझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करून फोटो काढणं योग्य नाही,” असं त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान, अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीसुद्धा जया बच्चन यांच्यावर तिखट टीका केली.

“सर्वाधिक बिघडलेली आणि विशेषाधिकार मिळालेली महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास फक्त त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत म्हणून सहन करतात.

ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसते,” असं कंगनाने लिहिलं.

Read also :https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yana-karuna-sharmanchi-offer/