धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांची ऑफर; “घर नसेल तर माझ्याकडे या”
मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही शासकीय बंगला रिकामा न केल्याने वाद पेटला आहे.
या पार्श्वभूमीवर करुणा शर्मा (माजी करुणा मुंडे) यांनी थेट ऑफर दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत राजीनामा दिला असला तरी सातपुडा हे शासकीय निवासस्थान त्यांनी अद्याप रिकामे केलेले नाही.
त्यामुळे त्यांच्यावर ४२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय न्यायालयाकडून त्यांना १० हजार रुपयांचा दंडही झाला आहे.
या प्रकरणात करुणा शर्मा म्हणाल्या, “मुंडे यांची मुंबईत पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझ येथे घरे आहेत.
तरीसुद्धा जर त्यांना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावे, मी त्यांना घर देईन.”
तसेच त्या म्हणाल्या, “४२ लाखांचा दंड मुंडेंसाठी काहीच नाही. ते पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत, इतकेच नव्हे तर आमदारपदही गमवावे लागेल.”
धनंजय मुंडे शासकीय बंगला कधी रिकामा करतील आणि दंड कधी भरतील, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती आणि अखेर त्यांनी पद सोडले.
Read also :https://ajinkyabharat.com/drdo-middle-80-padanchi-bharati/