अकोला :पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील एका बंद घराला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली.
स्थानिकांनी तत्काळ माहिती दिल्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
आगीत घराचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय गवई आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/upasarpanchanchi-hit-wicket-automatically-opposed-to-karun-gamavalam/