पाकिस्तानविरुद्ध सामन्यावर हरभजन सिंगचा संताप, बहिष्काराची मागणी

पाकिस्तानविरुद्ध सामन्यावर हरभजन सिंगचा संताप, बहिष्काराची मागणी

एशिया कप२०२५  : पाकिस्तानविरुद्ध सामन्यावर हरभजन सिंगचा संताप, बहिष्काराची मागणी

एशिया कप २०२५ पूर्वी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“आपले जवान सीमेवर  जीव धोक्यात घालतात, अनेकदा घरी परत येत नाहीत, आणि आपण मात्र पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायला जातो — हे योग्य आहे का?”

असा सवाल हरभजन यांनी उपस्थित केला.

पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, या विधानाची आठवण करून देत हरभजन सिंग यांनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.

आणि भारतीय संघाने एशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत बहिष्कार टाकावा, अशी स्पष्ट मागणी केली.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत.

देशातील जनभावना पाकिस्तानविरुद्ध असून, कोणत्याही क्षेत्रात सहकार्य नको, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.

अशा परिस्थितीत एशिया कप २०२५  मध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याने हरभजन यांनी रोष व्यक्त केला आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/chatgpt-vara-gambhir-allegation-mulna-dhokadayak-salle-dat-asa-amendment-claim/