४३ कोटींच्या अंगठीने रोनाल्डोचा साखरपुडा; आठ वर्षांच्या प्रेमकथेचा नवा टप्पा
फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोने अखेर आपल्या दीर्घकालीन प्रेयसी जॉर्जिना रोड्रिग्जसोबत साखरपुडा केला आहे.
जॉर्जिनाने स्वतःच्या इंस्टाग्रामवर रोनाल्डोसहचा फोटो शेअर करत “हो, मी तयार आहे… या जन्मात आणि प्रत्येक जन्मात” असा भावनिक कॅप्शन दिला.
या साखरपुड्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते जॉर्जिनाच्या हातातील महागड्या एंगेजमेंट रिंगने.
मीडिया रिपोर्टनुसार या अंगठीची किंमत तब्बल ५० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे कोटी ८१ लाख रुपये आहे.
ओव्हल-कट डायमंड, दोन्ही बाजूंना साइड स्टोन्स, D कलर आणि फ्लॉलेस क्लॅरिटी या वैशिष्ट्यांमुळे ही अंगठी खास ठरते.
तिचे वजन अंदाजे ३०कॅरेटपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
रोनाल्डो आणि जॉर्जिनाची पहिली भेट २०१६ मध्ये झाली. त्या वेळी जॉर्जिना एका स्टोअरमध्ये सेल्स असिस्टंट म्हणून काम करत होती.
काही दिवसांतच या अनपेक्षित भेटीचे रूपांतर प्रेमात झाले.
अर्जेंटिनात जन्मलेल्या आणि स्पेनमधील झाका शहरात वाढलेल्या जॉर्जिना आज एक प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
२०१७ मध्ये या दोघांनी आपले नाते सार्वजनिक केले होते.
आठ वर्षांच्या प्रेमकथेच्या या नव्या टप्प्यामुळे दोघांचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
READ MORE :https://ajinkyabharat.com/dewald-bravheescha-vadaki-tadakha-20-chandut-%e0%a5%af-%e0%a5%ac-dhawa/