डेवाल्ड ब्रेव्हीसचा वादळी तडाखा; २० चेंडूत ९६ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२५ रन्स
डार्विन – दक्षिण आफ्रिकेचा युवा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या आणि करो-मरो टी२० सामन्यात वादळी व ऐतिहासिक शतक ठोकत कांगारुंचा माज उतरवला.
केवळ २२ वर्ष १०५ दिवस वय असलेल्या ब्रेव्हीसने ५६ चेंडूत १२ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२५ धावा झळकावल्या.
यामध्ये फक्त २० चेंडूत तब्बल ९६ धावा काढत त्याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
पहिल्यांदाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करणारा ब्रेव्हीस हा दक्षिण आफ्रिकेसाठी या फॉरमॅटमध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला.
अर्धशतकापासून शतकाचा टप्पा त्याने फक्त १६ चेंडूत पार केला. ही खेळी करताना त्याने फाफ डु प्लेसीसचा २०१५ मध्ये विंडीजविरुद्ध केलेल्या ११९ धावांच्या विक्रमालाही मागे टाकले.
ब्रेव्हीसच्या जोरदार फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत २१९ धावा फटकावत ऑस्ट्रेलियासमोर भक्कम लक्ष्य ठेवले.
मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर असताना, हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी मिळाली आहे.
आता गोलंदाज या आव्हानाचा बचाव करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/brahmakumari-hirpur-shakhet-rakshabandhan-sohna-excited/