तरुणांसाठी सुवर्णसंधी : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात ९७६ पदांसाठी भरती, पगार १.४० लाख रुपये
नवी दिल्ली – सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) तर्फे ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या ९७६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
यासाठी अधिकृत अधिसूचना जारी झाली असून अर्ज प्रक्रिया २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होऊन २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
इच्छुक उमेदवार aai.aero या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदांची संख्या व तपशील
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर) – ११
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी – सिव्हिल) – १९९
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल) – २०८
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) – ५२७
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान) – ३१
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे संबंधित शाखेत (आर्किटेक्चर/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कंप्युटर सायन्स किंवा आयटी) बॅचलर पदवी आणि GATE परीक्षेचे वैध गुणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
२७ सप्टेंबर २०२५ रोजी कमाल वय २७ वर्षे असावे. राखीव प्रवर्गांना शासनमान्य सवलत लागू होईल – अनुसूचित जाती-जमातींना ५ वर्षे, ओबीसींना ३ वर्षे व दिव्यांग उमेदवारांना १० वर्षे.
पगार व सुविधा
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹४०,००० ते ₹१,४०,००० पगार, तसेच वैद्यकीय, पेन्शन, प्रवास भत्ता यांसह इतर सुविधा मिळतील.
अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ₹३०० शुल्क; एससी, एसटी व महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही.
अर्ज प्रक्रिया
AAI च्या aai.aero संकेतस्थळावर “Career” विभागातील ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती लिंक निवडून फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, शुल्क ऑनलाइन भरून फॉर्म सबमिट करावा व प्रिंट काढून ठेवावी.
ही भरती तरुणांसाठी सरकारी नोकरीसह चांगल्या पगाराची आणि स्थिर करिअरची उत्तम संधी ठरणार आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/thousands/