छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराने खळबळ; ड्रग्ज तस्कर फैजलने मैत्रिणीवर केला हल्ला
छत्रपती संभाजीनगर : शहरातील किलेअर्क भागात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अमली पदार्थ तस्करीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला फैजल उर्फ तेजा एजाज सय्यद (रा. किलेअर्क) याने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याचा प्रकार घडला.
गोळी मैत्रिणीच्या हाताला लागल्याने ती गंभीर जखमी असून, तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Related News
संभाजीनगरात बसून दंगल घडवण्याचं षडयंत्र; काही झालं तर एकनाथ शिंदे जबाबदार – Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठ...
Continue reading
Khavdya Dongar Case : संभाजीनगरातील खवड्या डोंगराचं रहस्य काय? ‘खवड्या’ असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगर सध्या एका धक्काद...
Continue reading
‘तुझा मित्र मुलीला पळवून घेऊन गेलाय, कुठे आहे सांग?’; तरुणाला मारहाण केल्याचा आरोप, संभाजीनगरात खळबळछत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू अस...
Continue reading
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याने 4 वर्गमित्रांवर चाकूने केले वार; संभाजीनगरातील शाळेत खळबळ
वर्गमित्रांवर चाकूने वार : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक...
Continue reading
अभिजीतचं लग्न कधी करणार? उद्धव ठाकरे यांनी आपुलकीने विचारताच आईने दिलं खास उत्तर; सीजेपी आंदोलनानंतर नवा चर्चेचा विषय
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां...
Continue reading
1 तरुणावर जीवघेणा हल्ला; धाडसी युवकांनी 2 मिनिटांत उलटवला डाव
छत्रपती संभाजीनगर: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत ...
Continue reading
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्तअवघ्या काही दिवसांत देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि तिचे ...
Continue reading
निदा खान प्रकरणात नवा ट्विस्ट; संजय शिरसाटांचा मोठा दावा, इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोपराज्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या निदा खान प्रकरणाने आता नवं वळण घेत...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमधील तरुणाईला झटपट गोरे होण्याची मानसिकता आणि सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे अनेकांना आता जीवघेणा अनुभव येत आहे. स्वस्तात मिळणाऱ्या आणि झटपट गोरे करण्याचा दावा करणाऱ्...
Continue reading
पराभवानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; छत्रपती संभाजीनगरमध्ये बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव ...
Continue reading
जामिनावर सुटून केवळ १० दिवसात पुन्हा गुन्हा
घटना काल (सोमवार) रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. आरोपी तेजा हा केवळ ८ ते १० दिवसांपूर्वीच जामिनावर जेलमधून बाहेर आला होता.
त्याच्यावर शस्त्रसाठा, बलात्कार, ड्रग्ज तस्करी यांसारखे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी एनडीपीएस पथकाने त्याच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अटक केली होती.
वादातून गोळीबार
काल रात्री फैजलची मैत्रीण त्याच्या घरी आली असता, दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून तीव्र वाद झाला.
हा वाद हाणामारीत बदलला आणि संतापाच्या भरात फैजलने आपल्या पिस्तुलातून गोळी झाडली.
गोळी थेट मैत्रिणीच्या हाताला लागून ती रक्तबंबाळ झाली.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
आरोपीला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली. जखमी तरुणीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, ती सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने पुढील तपास सुरू आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/mahayuratit-narajinatya-vadle-palakamantraipadavarun-churchna-tal/