धक्कादायक! सिरियातील रुग्णालयात सैनिकांचा नरसंहार — फरफटत नेलं, धाडधाड गोळ्या झाडल्या
सिरिया : जगभरात चालू असलेल्या युद्ध आणि संघर्षांच्या पार्श्वभूमीवर सिरियातून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.
रशियाच्या ‘सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ (SOHR) ने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओत, सत्ताधारी राष्ट्रपती अहमद अल शरा यांच्या
निष्ठावंत सैनिकांनी रुग्णालयात घुसून निष्पाप लोकांवर निर्दयी गोळीबार केल्याचे दिसत आहे.
रिपोर्टनुसार, हा प्रकार स्वैदा नॅशनल हॉस्पिटलमधील असून, गणवेशातील काही रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक भीतीने खाली बसलेले दिसतात.
याचवेळी शस्त्रधारी सैनिक त्यांच्यावर थेट लक्ष्य साधून धाडधाड गोळ्या झाडतात.
गोळी लागून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला फरफटत नेण्याचे दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
ही घटना द्रुज योद्धे आणि सुन्नी बेडॉईन जमातींमधील जुलै महिन्यातील संघर्षादरम्यान घडल्याचे सांगितले जाते.
या नरसंहारात अनेकांचे मृत्यू झाल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसते.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मानवी हक्क संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/gadegavamadhye-bakarila-vachwatana-ismacha-paniyya-budun-dishyu/