मुंबईत मुंबईत दहीहंडी सरावात दुर्दैवी घटना; ११ वर्षीय बालगोविंदाचा पडून मृत्यू, दहिसर परिसरात हळहळ सराव ; ११ वर्षीय बालगोविंदाचा पडून मृत्यू

मुंबईत दहीहंडी सरावात दुर्दैवी घटना; ११ वर्षीय बालगोविंदाचा पडून मृत्यू, दहिसर परिसरात हळहळ

मुंबईत दहीहंडी सरावात दुर्दैवी घटना; ११ वर्षीय बालगोविंदाचा पडून मृत्यू, दहिसर परिसरात हळहळ

मुंबईच्या दहिसर पूर्व केतकीपाडा परिसरात दहीहंडी सरावादरम्यान ११ वर्षीय बालगोविंदाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवाला या घटनेमुळे गालबोट लागले आहे.

रविवारी रात्री सुमारे अकरा वाजता नवतरुण गोविंदा पथक थर रचण्याचा सराव करत होते.

यावेळी वरच्या थरावर चढलेला महेश रमेश जाधव (वय ११ ) याचा अचानक तोल गेला आणि तो थेट जमिनीवर कोसळला.

गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दहिसर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून नेमका प्रकार कसा घडला याचा तपास सुरू आहे.

मुंबईतील दहीहंडी उत्सव १६  ऑगस्टला साजरा होणार आहे.

सात ते नऊ थरांच्या मानाच्या हंड्या फोडताना अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा योजनेची घोषणा असूनही ऑनलाईन प्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळे अनेक पथकांनी अद्याप विमा घेतलेला नाही.

Read also :https://ajinkyabharat.com/laturamadhyay-late-gopinath-mundencha-state/