काँग्रेसला मोठा धक्का! जळगावच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचा राजीनामा; अजित पवार गटात जाण्याची चर्चा जोरात
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज खळबळ माजवणारी घटना घडली आहे.
काँग्रेसच्या जळगाव जिल्ह्यातील प्रभावी आदिवासी नेत्या व प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाही आणि आता काँग्रेसला हा आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रतिभा शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
अल्पावधीतच त्यांनी पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र आज अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
प्रतिभा शिंदे या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोमात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा औपचारिक पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीसमोर गळतीचं आव्हान
महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीनंतर एकामागून एक धक्के बसत आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नंतर आता काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणावर नेत्यांची गळती सुरू आहे.
दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची महायुतीमध्ये “इनकमिंग” वाढत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या घडामोडींचा थेट फायदा महायुतीला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/mi-tyala-dada-mahanayche-pan/