रात्रीचा अंधार : चोरीचा थरार एक लाखाहून अधिक मुद्देमाल लंपास

रात्रीचा अंधार : चोरीचा थरार एक लाखाहून अधिक मुद्देमाल लंपास

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळीत दोन घरफोड्या; एक लाखाहून अधिक मुद्देमाल लंपास

मेहकर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथे अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करत

अंदाजे एक लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

ही घटना ११  ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता समोर आली.

सविस्तर माहितीनुसार, १०  ते ११  ऑगस्टच्या मध्यरात्री वरच्या बस स्टॉपजवळ असलेल्या

माऊली जनरल स्टोअर (मालक अभिमन्यू नाथा काळे) येथे चोरी झाली.

चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातील ५ ते ६ हजार रुपये रोख आणि ५०  ते ६०  हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

दुसऱ्या घटनेत, संजय बेंडमाळी यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी

कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील काही सोन्याचे मणी चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कोरडे, बेंडवाल व पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

तसेच, बुलढाणा येथील फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून बोटांचे ठसे व इतर पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला.

या दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये अंदाजे एक लाखाहून अधिक रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाला असून, पुढील तपास मेहकर पोलीस सुरू आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/vadilhanya-deathananthi-maidanavar-tham-jose-butlecha-sanghasathi-bhavuk-sighar/