कष्टाला कला जोडून ‘गणपती’ची निर्मिती; हिवरखेडच्या पायल सोनोनेचं आई-वडिलांना खास सहकार्य
बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथील बी.कॉम अंतीम वर्षात शिकणारी कु. पायल नीलकंठ सोनोने आपल्या आई-वडिलांना गणेशमूर्ती रंगवण्याचं सहकार्य करत आहे.
लहानपणापासूनच तिला कला आणि रंगकामाची आवड असून, घरातील पारंपरिक व्यवसायाला हातभार लावण्याची तिला विशेष ओढ आहे.
सोनोने कुटुंब कष्टाने उदरनिर्वाह करणारे.
संपूर्ण कुटुंबच मूर्तीकलाच आपला व्यवसाय मानून, माती व प्लास्टरपासून बैल, गणपती, दुर्गादेवी, महालक्ष्मीच्या मूर्ती,
पणत्या अशा विविध कलाकृती घडवतं. या मूर्ती फक्त विक्रीसाठी नव्हे, तर कुटुंबाच्या जगण्याचा आधार आहेत.
पायलचं शिक्षण आणि तिची कला यांचा सुंदर मेळ पाहून गावकरीसुद्धा कौतुक करत आहेत.
शिक्षणासोबत पारंपरिक कलेची जपणूक ही पायलने दिलेली एक प्रेरणादायी शिकवण ठरत आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/gaurav-morechanam-kandyapohyan/