अरबी समुद्रात हालचाली वाढल्या; भारत–पाकिस्तानकडून फायरिंग ड्रिलची तयारी
नवी दिल्ली / इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या शस्त्रसंधीनंतरही तणाव कायम असून, अरबी समुद्रात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत.
दोन्ही देशांकडून स्वतंत्रपणे फायरिंग ड्रिल करण्याची घोषणा करण्यात आली असून, NAVAREA वॉर्निंग जारी करण्यात आली आहे.
अलीकडे पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता.
त्याला प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारतावर जोरदार हल्ले केले. परिस्थिती हाताळण्यासाठी अमेरिकेच्या
मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाली; मात्र भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ रद्द न करता केवळ स्थगित ठेवले आहे.
पाकिस्तानकडून जारी केलेली सूचना :
पाकिस्तानने ११ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजल्यापासून ते १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत
मरीन ट्रॅफिकला ठराविक सागरी भागापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
भारताकडून जारी केलेली सूचना :
ओखा किनारा: ११ ऑगस्ट, सकाळी ११:३० ते दुपारी १ :३०
पोरबंदर किनारा: १२ ऑगस्ट, रात्री १२ :३० ते संध्याकाळी ६ :३०
मोरमुगाओ किनारा: १३ ऑगस्ट, दुपारी १ :३० ते संध्याकाळी ६ :00
या कालावधीत सर्व मरीन ट्रॅफिकला संबंधित भागापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
NAVAREA वॉर्निंग म्हणजे काय?
ही सूचना व्यापारी किंवा प्रवासी जहाजे आणि विमानांना धोका असलेल्या सागरी भागातून दूर राहण्यासाठी दिली जाते.
ड्रिलदरम्यान कोणतेही जहाज किंवा विमान त्या भागातून जाऊ नये, अशी सूचना असते.
या सागरी हालचालींमुळे तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, “या ड्रिल्समागील खरा संदेश काय?” हा प्रश्न संरक्षणतज्ज्ञांना पडला आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/70-kg-of-cow-dynasty-meat/
