८० किलो गोवंश मांस जप्त ; पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडले.

ऑपरेशन प्रहार ; ८० किलो गोवंश मांस जप्त तीन आरोपींना रंगेहात पकडले

मुर्तिजापूर : स्थानिक जुनी वस्तीतील परदेशी पुरा परिसरात पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना रंगेहात पकडले.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८० किलो गोवंश मांस जप्त केले असून, त्याची किंमत सुमारे ₹२४,००० इतकी आहे.

गुप्त माहितीनुसार, परदेशी पुरा येथे काही आरोपी गोवंश जातीचे जनावर कापून त्याचे मांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून धडक छापा टाकला.

रंगेहात पकडलेले आरोपी :

  • अब्दुल जाफर अब्दुल हन्नान (वय २३)

  • अब्दुल इरफान अब्दुल हन्नान (वय २५)

  • अब्दुल सुलतान अब्दुल हन्नान (वय २२)
    (सर्व रा. परदेशी पुरा, मुर्तिजापूर)

जप्त मुद्देमाल :

  • गोवंश मांस – ८० किलो (किंमत ₹२४,०००)

  • तीन लोखंडी धारदार सुरे – ₹३००

  • तीन लाकडी गठ्ठू – ₹१५०

  • लोखंडी वजन काटा – ₹२५०

  • १ किलो लोखंडी वजन – ₹५०
    एकूण किंमत : ₹२४,७५०

ही कारवाई ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि

उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोउपनि गणेश सुर्यवंशी, परी. पोउपनि नितीन राठोड, पोहवा सुरेश पांडे,

मंगेश विल्हेकर, पो. कॉ. सचिन दुबे, गजानन खेडकर, कृष्णा येरमुले आणि सोमनाथ फुके करीत आहेत.

Read also :https://ajinkyabharat.com/cricket-love/