जूही चावला : बॉलिवूडची ‘रिचेस्ट क्वीन’, तब्बल ₹४६०० कोटींची संपत्ती!
मुंबई : बॉलिवूडच्या ९० च्या दशकात आपल्या गोड हास्याने आणि हिट चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी जूही चावला आज ‘सर्वांत श्रीमंत अभिनेत्री’ म्हणून ओळखली जाते.
तिची एकूण संपत्ती तब्बल ₹ ४६०००कोटी असून ती ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्यापेक्षाही कितीतरी जास्त आहे.
विशेष म्हणजे, २००९ पासून जूहीने एकही मोठा हिट चित्रपट दिलेला नाही. तरीसुद्धा तिच्या संपत्तीत सतत वाढ होत आहे.
कारण तिच्या कमाईचे खरे स्रोत हे फक्त चित्रपट किंवा जाहिराती नसून मोठ्या प्रमाणातील व्यवसाय आणि गुंतवणूक आहेत.
शाहरुख खानसोबत कोलकाता नाईट रायडर्स (KKR)ची सहमालकी
पती जय मेहतासोबत रेड चिलीज एंटरटेनमेंटची सहसंस्थापिका
सौराष्ट्र सिमेंट लिमिटेडमध्ये मोठा हिस्सा
रिअल इस्टेट, रेस्टॉरंट्स आणि आलिशान प्रॉपर्टीजमध्ये मोठी गुंतवणूक
याशिवाय जूहीकडे आलिशान गाड्यांचा कलेक्शन आहे आणि ती मॅगी, पेप्सी, कुरकुरे, रुहफ्जा,
केलॉग्स, इमामी बोरोप्लस, केश किंग यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या जाहिराती करते.
चित्रपटसृष्टीतील स्टारडम कमी झालं तरी हुशार गुंतवणूक आणि विविध व्यवसायांच्या जोरावर जूही
चावलाने ‘बॉलिवूडची सर्वांत श्रीमंत अभिनेत्री’ हा किताब मिळवला आहे.
