नाशिकमधील बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा भंडाफोड, ५  जणांना अटक

बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश

सीबीआयची मोठी कारवाई

नाशिक : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये

भाड्याने घेतलेल्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत 5 जणांना अटक करण्यात आली असून, ५ ऑगस्ट रोजी मुंबईतील ६  आरोपी, अज्ञात खाजगी व्यक्ती

आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआयच्या तपासात हे कॉल सेंटर अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस असल्याचे भासवून अमेरिका, कॅनडा आणि इतर

देशांतील नागरिकांना फिशिंग व फसवे कॉल करून आर्थिक फसवणूक करत असल्याचे उघड झाले.

आरोपींनी गिफ्ट कार्ड आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे उकळले होते.

कारवाईदरम्यान सीबीआयने ४४ लॅपटॉप, ७१ मोबाईल फोन, १.२० कोटी रुपयांची रोकड, ५००  ग्रॅम सोने, १ कोटी किमतीच्या ७  लक्झरी कार,

अंदाजे ५००० USDT (सुमारे ५  लाख रुपये) क्रिप्टोकरन्सी आणि २०००  कॅनेडियन डॉलर (१.२६  लाख रुपये) किमतीची गिफ्ट व्हाउचर जप्त केली.

तपासात हेही स्पष्ट झाले की, आरोपींनी सुमारे ६० ऑपरेटर (डायलर, व्हेरिफायर आणि क्लोजर) नियुक्त करून हे बेकायदेशीर कॉल सेंटर चालवले होते.

कारवाईच्या वेळी ६२ कर्मचारी प्रत्यक्षात परदेशी नागरिकांना फसवणुकीचे कॉल करताना रंगेहात पकडले गेले.

या प्रकरणातील फसवणुकीचे प्रमाण, पीडितांची संख्या आणि या रॅकेटमागील इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सीबीआयचा तपास सुरू आहे.

Read also:https://ajinkyabharat.com/fra-chic/