एफआरएची सूचना – अनामत शुल्क आणि शुल्क आकारणीवर निर्बंध

एफआरएची सूचना – अनामत शुल्क आणि शुल्क आकारणीवर निर्बंध

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना एफआरएची सूचना – अनामत शुल्क आणि शुल्क आकारणीवर निर्बंध

राज्यातील खाजगी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना ठरवलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क किंवा वेगवेगळ्या

नावाखाली अनामत शुल्क आकारण्यास मनाई करण्यात आली आहे.

एफआरए सचिव डॉ. राजू चिखले यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात अनामत रक्कम केवळ एकदाच आकारावी

आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ती परत करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, विधी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान हा नियम काटेकोरपणे पाळावा,

असे निर्देश दिले आहेत. २०१५  च्या अधिनियम कलम १४ (५ ) नुसार एका शैक्षणिक वर्षासाठी ठरवलेल्या

शुल्कापेक्षा अधिक शुल्क वसूल केल्यास कलम २०  अंतर्गत कारवाई केली जाईल.

तसेच, वस्तीगृह व खानावळ सुविधा या ऐच्छिक असाव्यात, विद्यार्थ्यांवर त्यांचा वापर करण्याची सक्ती करू नये, असेही एफआरएने परिपत्रकात नमूद केले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/somwari-dhargad-mangawari-bordichi-yatra-thousand-bhavikanchi-gardi-expected/