परभणीत एसटी बस नाल्यात; ७५ प्रवासी बालबाल बचावले

परभणीत एसटी बस नाल्यात; ७५ प्रवासी बालबाल बचावले

परभणी – दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात परभणी जिल्ह्यातील मानवत येथे एसटी

बस थेट नाल्यात गेल्याची घटना घडली. सुदैवाने बसचालक, वाहकासह ७० ते ७५ प्रवासी सुखरूप बचावले.

परभणीहून बीडकडे जाणारी (क्रमांक MH २० BL ३८६०) बस मानवत शहरातील वळण रस्त्यावर रेणुका मंगल

कार्यालयासमोरून जात असताना अचानक समोर दुचाकीस्वार आला.

त्याला वाचवण्यासाठी बसचालकाने वळण घेतले आणि बस रस्त्याच्या खाली असलेल्या नाल्यात घसरली.

घटनेच्या ठिकाणापासून काही फुटांवरच विजेचा डीपी असल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.

Read also :https://ajinkyabharat.com/akotamidhye-bjp-pacch-spatial-swarajya-nivdnuk-adhawa-meeting/