अकोट – जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
भारतीय जनता पार्टी अकोट ग्रामीण व शहर मंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीला भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे,
जिल्हाध्यक्ष (अकोला ग्रामीण) संतोष शिवरकार, जिल्हा सरचिटणीस राजेश नागमते, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री पुंडकर,
आकोट ग्रामीण अध्यक्ष गोपाल मोहोड, शहर अध्यक्ष हरीश टावरी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणधीर सावरकर यांनी दोन्ही मंडळांचा सविस्तर आढावा घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाश भारसाकळे यांनीही कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
बैठकीचे प्रास्ताविक उमेश पवार यांनी केले तर संचालन मंगेश लोणकर यांनी केले.
Read also :https://ajinkyabharat.com/kabhutran-die/