अमरावती – खासदार नवनीत राणा यांना सोशल मीडियाद्वारे अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी
देण्याच्या प्रकरणी अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्र.२ ने मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.
६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री Isabhais नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ
पोस्ट करण्यात आला होता, ज्यात माजी खासदार नवनीत राणा यांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९६ , ३५१ , ३७९ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली
विशेष पथके अंजनगाव, परतवाडा, नागपूर, तुमसर, तिरोडा, दुर्ग व रायपूर येथे पाठविण्यात आली.
दोन दिवसांच्या सततच्या शोधानंतर मुख्य आरोपी शेख मुसा (२८ , रा. कोथरूड, ता. अंजनगाव, जि. अमरावती) यास भिलाई (छत्तीसगड) येथून अटक करण्यात आली.
मुख्य आरोपीस पळून जाण्यास मदत करणारे शेख मुस्ताक शेख (३२ ), भावसार मोहम्मद जाकीर शेख हसन (३७ ),
ऐजाज खान अहमद खान (२४ ) व जुबेर सुलतान सौदागर (२१ ) यांनाही ताब्यात घेण्यात आले.
मात्र, आरोपी अब्दुल मलिक शेख हसन व जफर खान उर्फ दादू इल्लास खान फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिस आयुक्तांनी इशारा दिला आहे की सोशल मीडियाचा गैरवापर करून धमकी किंवा अश्लील मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
Read also:https://ajinkyabharat.com/korpana-talukat-katha-dera-tapas-tapasani-moheem/