अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुंडा येथे शुक्रवारी ढगफुटी पाऊस झाला.
परिसरातील बांबर्डा येथे संततधार कोसळल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, कापूस, सोयाबीन, मूग यांसारखी
हंगामी पिके पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी तर पिके अक्षरशः दिसेनाशी झाली आहेत.
स्थानिक शेतकरी सांगतात की, पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे येणाऱ्या हंगामात मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी याकडे गंभीर लक्ष्य देऊन शासनाकडून तातडीने पंचनामा करून
शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/both-the-gaunani-gavathi-daru-japt-doghanwar-action/