तामसीत सिलेंडर स्फोट; जीव वाचविताना तरुण गंभीर जखमी

तामसीत सिलेंडर स्फोट; जीव वाचविताना तरुण गंभीर जखमी

अग्निवीर परीक्षेत यशस्वी; पाय भाजल्याने उपचार सुरू, आर्थिक मदतीची गरज

वाडेगाव : येथून जवळच असलेल्या तामसी येथे  दि.५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या सिलेंडर

स्फोटात कुटुंबाचा जीव वाचविताना एक १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. या तरुणाचा पाय पूर्णपणे भाजला

असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.जखमी तरुण आदित्य सुभाष पातोडे हा अग्निवीर परीक्षेत यशस्वी

झाला असून काही दिवसांत त्याची शारीरिक चाचणी होणार होती.

मात्र अपघातात पाय भाजल्याने त्याच्या स्वप्नांवर विरजण पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिकाजी गवळी यांच्या घरात स्वयंपाकासाठी पत्नीने गॅस सिलेंडर लावताच अचानक भडका उडाला.

यात घाबरून धावपळ झाली. आग विझविण्यासाठी भिकाजी गवळी (वय ५२) आणि आदित्य पातोडे यांनी ओल्या कपड्याने प्रयत्न केला; मात्र आगीच्या

लाटेत सापडून दोघांच्या अंगाला व पायाला भाजल्या गेल्या.ही घटना घडताच परिसरात आरडाओरड झाली.

शेजारी अमर सिद्धार्थ पातोडे, प्रदीप इंगळे, हर्षानंदन सरदार, गोपाल बोरसे यांनी तत्काळ धाव घेऊन कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले.

जखमी आदित्यने इंडेन गॅस कंपनीकडून आर्थिक मदत किंवा विमा मिळावा, अशी मागणी केली आहे.

“जीव वाचविणे जर आयुष्य पणाला लागत असेल, तर काय करावे?” असा कडवट सवालही त्याने उपस्थित केला.

घटनेची माहिती मिळताच सरपंच आनंद पातोडे यांनी तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मदत अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

Read Also :https://ajinkyabharat.com/truck-2/