ट्रकची ट्रकला जोरदार धडक; चालक-क्लिनर गंभीर जखमी

कारंजा लाड : नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने दि.८ रोजी सकाळी

समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १८३ जवळ समोरच्याच दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकला मागून जबर धडक दिली.

या अपघातात ट्रक चालक शेख जावेद वय ४० रा.छत्रपती संभाजीनगर व क्लिनर राजेश पेटकर वय ४५ रा. छत्रपती संभाजीनगर गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालकला  झोपेची डुलकी आल्याने हा अपघात झाला.

धडकेत चालक कॅबिनमध्ये अडकून पडला.

दरम्यान, समोर असलेल्या ट्रकचालकाने  तत्परता दाखवत ट्रक रस्त्याच्या कडेला

थांबवून अपघाताची माहिती समृद्धी कंट्रोल रूमला दिली.

सूचना मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कटरच्या साहाय्याने अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढले.

Read Also :https://ajinkyabharat.com/nirguna-dhichaya-puratun-yuvakachi-thararak-sutka/