अकोला : तापडिया नगर परिसरात गुरुवारी दहशत माजवणाऱ्या स्थानिक गुंडाची पोलिसांनी धिंड
काढत कान पकडून सार्वजनिक माफी मागायला लावली. या कारवाईनंतर परिसरात दिलासा पसरला आहे.
रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ‘कल्लू तिवारी’
या स्थानिक गुंडाने हातात फावडा घेऊन तीन ते चार दुकाने फोडली व परिसरात दहशत पसरवली.
खंडणीसाठी केलेल्या या तोडफोडीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही मिनिटांतच परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीची तापडिया नगरातून धिंड काढली व त्याला सर्वांसमोर कान पकडून माफी मागायला लावली.
“यापुढे असे करणार नाही,” अशी कबुली आरोपीने दिली.
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/bharatratna-dr-swaminathan-yanchi-jayanti-shashwat-sheti-din-mhanoon-saji/