अकोला -हिवरखेड शहरातील श्री मोठा महादेव संस्थान येथे शिवपुराण भागवत सप्ताह सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
श्रावण मासाच्या पवित्र वातावरणात आयोजित या सप्ताहात कीर्तन, भजन, हरिपाठ यांसह विविध धार्मिक कार्यक्रम रंगले.
परिसर शिवमय झाल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
शिवपुराण कथा ह.भ.प. चेडे महाराज यांच्या सागता दिली.
अखेरच्या दिवशी गोपाल काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.
सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महादेव-पार्वती विवाह सोहळा होता.
यात स्थानिक शिवाजी चिंतामणराव खिरोडकार आणि त्यांची पत्नी सौ. मनीषा खिरोडकार यांनी महादेव-पार्वतीची भूमिका साकारली.
या विवाह सोहळ्याला महिला-पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मोठा महादेव संस्थान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व विठ्ठल मंदिर संस्थानच्या वारकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी सेवा दिली.
पंचक्रोशीतील भाविकांनी शिवपुराण कथा आणि महाप्रसादाचा लाभ घेत, सोहळ्याची धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेने सांगता झाली.
Read Also :https://ajinkyabharat.com/parking-thar-karna-bajetcha-saiko-thriller-tharla-national-award-winner/