माजी मुख्यमंत्र्यांनी शिक्षण घेतलेल्या जर्जरावस्थेतील शाळेसाठी मंजूर लक्षावधीची निधी धुळखात पडून
मानोरा ता प्र देशाचे उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सुजलाम
सुफलाम करणाऱ्या माजी मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या विठोली
ता. मानोरा जि. वाशिम येथील शाळेची अत्यंत जर्जर अवस्था झाली मोडकळीस आलेल्या ह्या वास्तूच्या दुरुस्ती
व डागडूजी ची वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने प्रशासनाच्या ह्या वेळकाढू
धोरणाचा निषेध म्हणून आठ ऑगस्ट क्रांती दिनीच्या पूर्वसंध्येपासून विठोली येथे अखिल भारतीय तांडा सुधार
समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आंदोलन करण्यात
येणार असल्याची माहिती मानोरा तालुकाध्यक्ष डॉ. गणेश राठोड यांनी दिली.
संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेतून मंजूर २० लक्ष रुपयाच्या निधीतून मोडकळीस आलेल्या
शाळा इमारतीची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी शासनाने विस लक्ष रुपये मंजूर करून वर्ष ओलंडला आहे.
कामाचे इस्टीमेट सुद्धा झालेले असून देखील स्थानिक पं. समिती प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही.
त्यामुळे मंजूर निधितुन विठोली जिल्हा परिषद शाळेच्या इमारत दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी
तांडा सुधार समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश राठोड यानी केली आहे.याबद्दलचे अधिकृत निवेदन तांडा सुधार समितिने
दि. ७ जुलै २०२५ रोजी प्रशासनाला दिले असुन समिती आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे राष्ट्रीय महासचिव नामा बंजारा यांनी कलविले आहे.
या कामाचे इस्टिमेट होऊन तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे.अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने वारंवार निवेदन देऊन
या शाळेला स्मारक घोषित करावे अशी मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या डॉ. गणेश राठोड तालुका अध्यक्ष,
रामराव चव्हाण तालुका उपाध्यक्ष, डॉ. सुधाकर राठोड तालुका सचिव, संकेत राठोड तालुका संघटक,
धर्मराज आड़े सहसचिव यांनी मागील अनेक वर्षापासून लावून धरली आहे.
विठोली येथे शिक्षण झालेले हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे शेतकऱ्यांचे दैवत असून महापुरुषांची प्रशासनाकडून
अवहेलना वेदनादायी व संतापजनक असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय तांडा
सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी यानिमित्ताने प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
Read Also : https://ajinkyabharat.com/11-vy-hatmag-dinimit-vinkar-mahilana-vivar-id-cardche-whats/