उंबर्डा बाजार येथे पावसाची जोरदार हजेरी

उंबर्डा बाजार येथे पावसाची जोरदार हजेरी

पिकांना मिळाली संजीवनी

उंबर्डा बाजार : (वार्ताहर)

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी उंबर्डा बाजारसह परिसरात सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी

बरसल्या सकाळपासून सुरू झालेला संंततधार पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. पिकांना जीवनदान मिळाल्याने

शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यासह सखल भागात पाणी साचले होते.

या पावसाने खरिप पिकांना जीवदान मिळाले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी सोयाबीन,

कपाशी, तुर, उळीद, तसेच इतर खरिप पिकांची लागवड केली.

परंतू येण सोयाबीनला फुल येण्याच्या अवस्थेत असतांना पावसाने उघडीप दिल्याने पिके धोक्यात आली होती.

त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे.

किमान खरिप पिके वाचली तरी काही पैसे पदरी पडतील या आशेने शेतकरी आनंदून गेले.

तर अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिक व नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

तर उंबर्डा बाजार ते जांब रोडवरील हनुमान मंदिरा जवळील पुला वरुण पाणी वाहत होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/polis-superintendent/