अजिंक्य भारत न्यूज च्या बातमीची घेण्यात आली दखल
एका आईच्या ममतेवर संकट आलं होतं पण न्यायाने पुन्हा तिच्या कुशीत तिचं लेकरू परत
आणलं अकोल्यातल्या रामदास पेठ पोलीस ठाण्यात समोर आलेल्या नवजात अपहरण प्रकरणाने
संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पुढाकारामुळे आणि अजिंक्य
भारत न्यूजच्या ठाम पत्रकारितेमुळे गुरुवारी हे अपहरण झालेलं बालक परत मातेच्या कुशीत आलं तेही बारशाच्या दिवशी.
घटनेची माहिती अशी की बाळा पुढच्या मेहेरबानू मोहम्मद शाकिब यांनी आपले नवजात बाळ जबरदस्तीने पतीने
अपहरण केल्याची तक्रार रामदास पेठ पोलीस ठाण्यात केली. खाजगी रुग्णालयातून या बाळाला तिच्या संमतीशिवाय
तो घेऊन गेला होता विशेष बाब म्हणजे मेहरबानू यांचे सिजर झालेले असताना त्या शारीरिक वेदनेत होत्या
तरीही तिचं अवघ्या काही दिवसाचं तिच्या जवळून जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आलं ते बाळही
आजारी होतं आणि त्याला आईच्या दुधाची गरज होती पण ती माता काहीच करू शकत नव्हती.
आपलं बाळ परत मिळवण्यासाठी ती सैरावैरा धावत होती पोलिसांकडे गेली पण तिचं म्हणणं सुरुवातीला ऐकून
घेण्यात आलं नाही अखेर अजिंक्य भारत योजनेत बातमी टाकली आणि या मातेचे
बाळ पुन्हा तिच्या कुशीत आलं आणि तेही बारशाच्या दिवशी.
अजिंक्य भारत न्युज करिता विठ्ठल महाले यांची विशेष रिपोर्ट.
Read Also : https://ajinkyabharat.com/kavad-yatravar-kalacha-ghala/