आईचा पोलिसांत आक्रोश..
“माझं बाळ परत द्या, थेट पोलीस अधीक्षकांकडे आईची तक्रार..
अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ दहा दिवसांच्या बाळाला पित्यानेच आईपासून जबरदस्तीने वेगळं केलं असून,
आईचा आक्रोश सुरू आहे. मेहरा बानो यांचा विवाह मोहम्मद शकीब यांच्याशी झाला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी गर्भावस्थेतच बाळंतपणासाठी मेहरा बानो’ला घेण्यासाठी गेले असता तिच्या पतीच्या नातेवाईकांना मारहाण झाली होती.
दरम्यान,२५ जुलै रोजी बाळ जन्माला आल्यानंतर, ४ ऑगस्ट रोजी पतीने हॉस्पिटलमधून बाळाला घेऊन गेला.
आईने रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली, मात्र दखल न घेतल्याने तिने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं.
“माझं बाळ मला द्या, नाहीतर मी स्वतःला काही करेन” असा इशाराही तिने दिला.
आता या आईला न्याय मिळेल का? हाच मोठा प्रश्न निर्माण झालाय.
तर दुसरीकडे ही घटना केवळ कौटुंबिक वादापलीकडची असून एका आईच्या मायेचा आणि मुलाच्या हक्काचा प्रश्न आहे.
संबंधित यंत्रणेने तातडीने हस्तक्षेप करून बाळाच्या आईला न्याय द्यावा हीच अपेक्षा आईने व्यक्त केलीय.
Read Also : https://ajinkyabharat.com/humani-aimue-shetakyanche-motha-aam-aamdarni-kelly-peak-pahani/