अमरावती विभाग प्रादेशिक उपसंचालकांची तक्रारकर्त्यांने घेतली भेट.
मानोरा ता प्र
तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या इतर मागास व-बहुजन कल्याण विभागा मार्फत खाजगी आस्थापनांद्वारा चालविल्या जात
असलेल्या प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासकीय निधीचा अपहार करून ज्या समाज घटकांसाठी ही शाळा,
महाविद्यालये चालविली जातात त्या भटक्या विमुक्तांच्या टाळू वरील लोणी संस्था पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना
हाताशी धरून खात असल्याचा तक्रारकर्ते सरदार विष्णू राठोड यांनी अमरावती विभागाचे इतर मागास व बहुजन कल्याण
विभागाच्या प्रादेशिक उपसंचालकांची भेट घेऊन आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या अमरावती प्रादेशिक उपसंचालनालय अखत्यारीत अमरावती, अकोला,
यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात निवासाला असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील मागास
नागरिकांच्या पाल्यांचे गुणवत्ता पूर्ण शिक्षण व्हावे आणि या समुदायाच्या विद्यार्थ्यांना उच्चभौतिक सुविधा असलेली निवासी
वस्तीगृहांसाठी वर्षाला कोट्यावधी रुपयाचे अनुदान शासनाकडून उपलब्ध करून दिले जाते.
शासकीय अनुदान नियम व निकषांना डावलून उपरोक्त विभागाच्या काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी
धरून मानोरा तालुक्यातील खाजगी शिक्षण संस्था पदाधिकारी मागील अनेक वर्षांपासून लक्षावधीचे
अनुदान ओरबाडत असल्याचे प्रकार गत दोन वर्षांपासून गाजत आहेत.
खोटे विद्यार्थी दाखवून अनुदान उचलणे, वस्तीगृहात निवासाला नसतानाही डे स्कॉलर विद्यार्थ्यांना निवासी दाखविणे.
बेकायदेशीरपणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करणे आदी प्रकार सर्रास सुरू असून कोणी तक्रार केल्यास
जिल्हा तथा प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाकडून वर्षानुवर्षे चौकशी समितीचा उतारा काढून भ्रष्ट संस्था पदाधिकाऱ्यांची
पाठराखण केल्या जात असल्याचे सातत्याने उघड होत असल्याचे बोलले जात आहे.
ईंगलवाडी येथील माध्यमिक आश्रम शाळेत शासन व भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांची घोर फसवणूक संस्था
पदाधिकारी करीत असल्याची तक्रार सरदार विष्णू राठोड इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हा प्रशासनाकडे
करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती
मात्र जिल्हा प्रशासनाकडून संस्था पदाधिकारी व शाळा प्रशासनाची पाठराखण केली जात असल्याचे दिसताच राठोड यांनी थेट
अमरावती येथील प्रादेशिक उपसंचालकांची भेट घेऊन तातडीने तक्रारीत नमूद बिंदूंची चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/local-geni-shrine-under-operation-prahar/