ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखे ची कारवाई

ऑपरेशन प्रहार" अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखे ची कारवाई

अकोट फाईल हद्दीत परदेशिपुरा येथे अवैध गावठी दारूच्या अड्ड्या वर रेड,

63 हजार 700 रु. चा मुद्देमाल नाश

अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.

दि.5 ऑगस्ट रोजी पथकासह खाजगी वाहनाने पो स्टे. अकोट फाईल हद्दीत परदेशीं पुरा येथे पंचासमक्ष गावठी

हातभट्टी दारू रेड केली असता, आरोपी नामे सन्नी सुशील बौराशी वय 32 वर्ष,

रा. लाडीज फाईल परदेशीं पुरा अकोट फाईल अकोला हा त्याचे राहते घरी गावठी हातभट्टी दारू

गळताना मिळून आला त्याचे ताब्यातून 200 लिटर गावठी दारू प्रति लिटर 100/- रू. प्रमाणे 20000/- रू व प्लास्टिक ड्रम

मध्ये 400 लिटर मोहा सळवा किंमत 40000/-रू व गॅस शेगडी किंमत 3500/- व स्टील

बबरी किंमत 200 रू. असा एकूण 63700/- रू चा मुद्देमाल आरोपी घरून जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपी विरुद्ध पो स्टे. अकोट फाईल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojana-crisis/