ढगफुटीचं संकट वाढतंय! उत्तरकाशीतील दुर्घटनेमागे हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप जबाबदार

ढगफुटीचं संकट वाढतंय! उत्तरकाशीतील दुर्घटनेमागे हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप जबाबदार

उत्तराखंडमधील थराली गावात झालेल्या भीषण ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला

असून ५० हून अधिक जण बेपत्ता आहेत. मंगळवारी रात्री अचानक झालेल्या प्रचंड

पावसामुळे गावात पूर आणि भूस्खलनाची भीषण स्थिती निर्माण झाली.

शास्त्रज्ञांच्या मते, हिमालयाची नाजूक रचना, वाढता हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप ही ढगफुटीमागील प्रमुख कारणं आहेत.

अवघ्या एका तासात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली, ज्यामुळे नदी-नाल्यांचा रस्ता बंद होऊन गावात पाणी घुसलं.

बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी पथके कार्यरत आहेत.

वनतोड, अनियंत्रित बांधकामे आणि जलनिस्सारण यंत्रणेतील बिघाडामुळे अशा आपत्तींचं प्रमाण वाढत असल्याचा

इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. त्यांनी असा इशाराही दिला आहे की,

अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात भारतातील इतर डोंगराळ भागांमध्येही ढगफुटीचे प्रमाण वाढू शकते.

संपादकीय टीप: निसर्गाच्या संतुलनाशी छेडछाड थांबवणं, शाश्वत विकासावर भर देणं

आणि पर्यावरण संवर्धन हाच या आपत्ती टाळण्याचा एकमेव मार्ग आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/khadseche-javai-pranjal-khawalkar-adchanit/