अडगांव बु ॥ (प्रतिनिधी ) येथिल जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अडगांव बु ॥
येथे सामाजिक वनीकरण विभाग तेल्हारा व हरित सेने अंतर्गत एक पेड मॉ के नाम या उपक्रमातर्गत
विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य चारूदत्त मेहरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तेल्हारा
वनक्षेत्राचे वनपाल एस बि सुईवाल व व्हि एस पराते वनरक्षक उपस्थित होते
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानरवडे यांची उपस्थिती होती .
विद्यालयातील विद्यार्थाच्या हस्ते सपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थाना वृक्ष वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
तसेच वृक्ष संवर्धन व संगोपनाची विद्यार्थांना माहिती देण्यात आली तसेच प्रत्येक विद्यार्थाने
आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे योग्य प्रकारे संगोपन करावे याकरता सर्व विद्यार्थाना शपथ दिन्यात आली .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय
चे प्रा . सतोष गायकवाड तसेच विद्यालयाचे श्री मिसाळ ,
सौ निकीता निखाडे , अभिजित लोखंडे , मिलींद लोखंडे ,
कु प्रणाली साबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/shetkyanasathi-debt-forbody-declaration/