DA मध्ये ३% वाढ होण्याची शक्यता
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी महागाई भत्ता (DA) ३% नी वाढू शकतो.
सध्या डीए ५५% असून तो वाढून ५८% होईल असा अंदाज आहे.
पगारात किती फायदा?
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४०,००० रुपये असेल तर सध्याच्या ५५% डीएप्रमाणे २२,००० रुपये मिळतात. ५८% झाल्यास ही रक्कम २३,२०० रुपये होईल, म्हणजे दरमहा १,२०० रुपयांची थेट वाढ.
याशिवाय, TA, HRA आणि इतर भत्त्यांवरही याचा परिणाम होणार आहे.
CPI-IW आकडेवारीचा आधार
जून २०२५ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) १ अंकाने वाढून १४५ झाला आहे. यामुळे डीए वाढ होण्याची शक्यता मजबूत झाली आहे.
दिवाळीपूर्वी घोषणा अपेक्षित
सरकार सहसा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निर्णय जाहीर करते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्त पगार व पेन्शन मिळेल.
गेल्या वेळी केवळ २% वाढ झाल्याने कर्मचारी नाराज झाले होते; मात्र यावेळी ३% वाढ होण्याची तज्ज्ञांना खात्री आहे.