मतीमंद हरवलेल्या मुलाला पत्रकार व पोलीसांच्या मदतीने दिले आई वडीलांच्या ताब्यात!

मतीमंद हरवलेल्या मुलाला पत्रकार व पोलीसांच्या मदतीने दिले आई वडीलांच्या ताब्यात!

मुंडगाव प्रतिनिधी …
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे मतीमंद हरवलेल्या मुलगा येथील पत्रकार स्वप्नील सरकटे व विशाल गवई यांना मुंडगाव येथे पिशवी घेऊन भटकताना दिसला असता त्यांनी त्या १० वर्षीय मुलाला विचार पुस केली असता तो मतीमंद असल्याचे समजले तात्काळ अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे यांना माहिती देण्यात आली असता बंदोबस्त असतानाही सुद्धा ठाणेदार किशोर जुनगरे यांनी कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता बिट जमादार निलेश खंडारे यांना पाठवुन सदर पोलीसांनी तपासचक्र फिरवत जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील सर्व पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आली असता या मुलांच्या आई वडीलांनी पथ्रोट जिल्हा अमरावती येथील पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची फिर्याद दिली होती.अकोट पोलीसांच्या मेसेज वरून तो मतीमंद मुलगा हर्षल पुरुषोत्तम धुळे वय १०वर्ष रा पथ्रोट असल्याचे निष्पन्न झाले.त्याच्या आई वडीलांना माहिती मिळताच त्या मुलांचे आई वडीलांनी अकोट पोलीस स्टेशन गाठले असता मुलाला पाहून आई वडीलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व अकोट पोलीसांच्या मदतीने आई वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले.त्या मुळ पत्रकार सरकटे व गवई यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.