मानोरा (ता. प्र.) – मानोरा पोलिस ठाण्यात नव्यानेच नियुक्त झालेल्या ठाणेदार
नैना पोहेकर यांचा ४ ऑगस्ट रोजी जुनी वस्ती येथील युवकांनी सन्मान करत सत्कार केला.
या कार्यक्रमात डॉ. विशाल पंचशील शिरसाट, प्रविण आडुळे, विशाल राठोड,
अभिजित गुल्हाने, नजीर शेख, सलमान शेख, सुरेश शिरसाट, किसन वायले,
सिद्धार्थ खंडारे, आशिष अवचार, राहुल शिरसाट, प्रदीप गायकवाड, सुहास शिकारे यांसह अनेक युवक सहभागी झाले होते.
कार्यक्रमात ठाणेदार पोहेकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी त्यांनी गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
Read Also : https://ajinkyabharat.com/restrained-toilet-toilet/