मुदत वाढी संदर्भात मुख्याधिकारी याची सकारात्मकता
अकोट
आकोट नगर परिषदने २०२५-२६ ते २०२८-२९ चतुर्थ कर निर्धारण करण्याच्या नोटीसेवर हरकत दाखल करण्याकरीता एक
महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, कर भरण्याकरीता हरकत अर्जा सोबत २०२४-२५ चा कर भरण्याची अट रद्द करुन
हरकत अर्ज स्विकारण्यात यावे तसेच थकीत कर मालमत्ता धारकांना अभय योजनेचा लाभ देण्यात येऊन शभर टक्के व्याज
माफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी
तथा प्रशासक नरेंद्र बेंबरे यांना देण्यात आले.या निवेदनात आकोट नगर परीषदेने शहरातील मालमत्तावर ६ आगस्ट
पर्यंत हरकती मागविल्या आहेत. हरकत दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ येऊन सुद्धा ब-याच मालमत्ता धारकांना
कर आकारणी च्या नोटीसेस मिळाल्या नाहीत त्यामुळे असे मालमत्ता धारक हरकत घेण्यापासुन वंचित राहु शकतात तसेच
मालमत्ता धारकांना कर निर्धारण करण्याच्या नोटीसेस वर हरकत दाखल करण्याकरीता २०२४-२५ चा कर भरल्याची पावती
जोडल्याशीवाय हरकत दाखल करुन घेतल्या जात नाही, कर भरण्याबाबत सक्ती केल्या जात आहे हे नियमबाह्य आहे.
शासनाने थकीत मालमत्ता धारकांकरीता अभय योजना लागु केली आहे जे मालमत्ता धारक थकीत कर भरण्याकरीता येत आहे
त्यांचे मुद्दल रक्कमेचा भरणा करुन घेण्यात येऊन त्याचे शंभर टक्के व्याजमाफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावे.
अशी मागणी निवेदनात माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, हरीश टावरी प्रभाकर मानकर मंगेश लोणकर विक्रम
सिंह ठाकुर विवेक धुळे,मनोज चंदन, श्रीकांत गायगोले, जितु जे स्वाणी,विशाल दाभाडे,कुसुम ताई भगत, अक्षय भगत,चंदू परवानी,
श्रीकांत तळोकार, दीपक जेस्वानी, राजकुमार जाधवानी, गोपाल देशमुख,प्रतीक झुनझुन वाला, शंतनु चरपे,जयंत लोणकर,
सागर सरप जय चोखंडे,अनिकेत फुरसुले,यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
याप्रसंगी मुख्याधिकारी यांनी मुदत वाढी संदर्भात सकारात्मकता दर्शविल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Read Also : https://ajinkyabharat.com/hirpur-marge-janya-rastyavari-direction/