हिरपूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशा फलक गायब – नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

हिरपूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशा फलक गायब – नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

हिरपूर (ता. मुर्तीजापूर, जि. अकोला) –

हिरपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले दिशा दर्शक फलक गेल्या काही दिवसांपासून गायब असून

त्यामुळे प्रवाशांना मार्ग शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हिरपूर येथून ब्रह्मी, हिवरा कोरडे, बोर्टा, आसरा , अमरावती,तसेच टिपटाळा खापरवाडा, लोणसाणा,

दापुरा,ऋणमोचन ,शेलु बाजार, मार्गे सुद्धा वाहने जातात या मार्गे लोक जातात आहे. येथे दररोज हजारो वाहने ये-जा करतात.

त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक उभारले होते.

परंतु अलीकडे हे फलक एकामागून एक गायब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

स्थानिक नागरिकांचा संशय आहे की, या फलकांची चोरी झाली असावी किंवा दुर्लक्षामुळे ते हटवले गेले असावेत.

फलकांवर गावाचे नाव, अंतर, आणि पुढील ठिकाणांची माहिती असायची.

हे फलक नसल्यानं बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना योग्य मार्ग न मिळाल्यामुळे ते इतर रस्त्यांवर भरकटत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/khekdi-grampanchayati-both-shetkayanchaya-gharla-fire/